1.2 विजेचा शॉक लागू नये म्हणून घ्यावयाची काळजी :

1.2] विजेचा शॉक लागू नये म्हणून घ्यावयाची काळजी :

1) विजेवर काम करीत असताना नेहमी इन्सुलेटेड हत्यारेच वापरावे.

2) एखाद्या उपकरणांची वायर खराब झाली असल्यास ती वायर बदलल्याशिवाय काम करू नये,

3) स्विच, प्लग, होल्डर इत्यादी साधनांवरील आवरणे फुटली असल्यास ते ताबडतोब बदलावे

4) उपकरणांच्या धातुयुक्त बॉडीला अर्धांग जोडावे.

5) चालू लाईनवर काम करू नये.

6) विजेमुळे लागलेल्या आगीस विझवण्यासाठी त्यावर पाणी टाकू नये.

7) विजेचे अस्तित्व पाहण्यासाठी हाताचा वापर करू नये.

8) एखाद्या इन्स्टॉलेशन अगर पॉईंटचा स्विच बंद केल्या नंतरही विद्युत सप्लाय बंद झाल्याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय तेथे काम करू नये.

9) वायरच्या जॉईंटवर इन्सुलेशन टेप गुंडाळावी.

10) फ्युज तार बदलते वेळी मेन स्विच बंद करावा.

1.3 ] विजेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस दूर करतेवेळी घ्यावयाची दक्षता :

एखादी व्यक्ती विजेच्या संपर्कात आली असल्यास त्या ठिकाणचा वीजपुरवठा ताबडतोब बंद करावा. जर ते शक्य नसेल तर त्या व्यक्तीला जिवंत भागापासून दूर करण्यासाठी आपल्या हातात रबरी हातमोजे घालून त्यास दूर करावे. रबरी हातमोजे उपलब्ध नसतील तर त्यास कोरड्या कापडाने धरून दूर ढकलावे, तेही शक्य नसेल तर कोरडे कपडे, वर्तमानपत्राचा छोटासा गठ्ठा, वाळलेले लाकूड किंवा झाडू यांच्या साह्याने त्यास ढकलून दूर करावे किंवा कोरड्या लाकडावर उभे राहून काठीने दूर करावे, परंतु कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीस प्रत्यक्ष आपल्या हाताने धरून ओढू नये. तर त्यापूर्वी आपन स्वतः इन्सुलेट व्हावे, कारण आपन इन्सुलेट नाही झालो तर, त्या अपघाती व्यक्तिस स्पर्श केल्यास आपना स्वतः स शॉक बसतो.

1.4 ] विजेच्या संपर्कापासून दूर केल्यानंतर घ्यावयाची दक्षता :- 

अपघाती व्यक्तीला विजेपासून दूर केल्यानंतर त्यावर डॉक्टर येण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपाचा प्रथमोपचार करावा. त्यासाठी खालील दक्षता घ्यावी.

1) अपघाती व्यक्तीस मोकळ्या हवेत ठेवावे.

2) आवश्यकता भासल्यास अंगावरील कपडे सैल करावेत.

3) जखम झाली असेल अथवा एखाद्या अवयवास इजा होत असेल तर तो अवयव आराम वाटेल अशा स्थितीत ठेवावा, जखम उघडी ठेवू नये.

4) आपघाती व्यक्ती बेशुध्द असल्यास त्यास शुध्दीवर आणण्यासाठी कृत्रिम श्वासोश्वास पध्दतीचा वापर करावा,

5) शुध्दीवर आल्यानंतर त्यास चहा, कॉफी असे पेय तो पिवू शकत असल्यास पिण्यास द्यावे.

6) अपघात मोठ्या स्वरूपाचा असल्यास आणि शक्य असल्यास अपघात स्थळीच डॉक्टरांना बोलावून आणावे.

7) डॉक्टर येण्यापूर्वी आपण करीत असलेला उपचार हा प्राथमिक व तात्पुरताच आहे हे लक्षात ठेवून उपचार करावे.

8) उपचार करणाऱ्या व्यक्तीने अपघाती व्यक्तीशी ममतेने, प्रेमाने, व सद्भावनेने वागून सहानुभूतिपूर्वक उपचार करावा, उपचार म्हणजे मनुष्य सेवा व मनुष्य सेवा म्हणजेच राष्ट्रसेवा असे थोर विचार मनाशी बाळगून उपचार करावा.

9) अपघाती व्यक्तीचे जागेवरच निधन झाल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही केल्याशिवाय पुढील हालचाल करू नये.

1.5 ] विद्युत क्षेत्रात काम करीत असतांना घ्यावयाची काळजी :

1) कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तेथील सर्किटचा मुख्य स्विच बंद करावा व त्यातील फ्युज किटकेंट सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यावे.

2) सर्किटची जिवंत तार (फेज किंवा पॉझीटीव्ह) नेहमी स्विचमार्फत जोडावी.

3) शिडीवर उभे राहून काम करतेवेळी शिडी सरळ उभी न लावता थोडीशी तिरकस लावावी व शिडी धरण्यास मदतनिसाची मदत घ्यावी.

4) उपकरणांची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्यास विजपुरवठा (सप्लाय) देऊ नये. अथवा उपकरण किंवा मशीन चालू करू नये.

5) ओलसर जागेत उभे राहून काम करू नये.

6) कोणत्याही उपकरणांची दुरूस्ती करण्यापूर्वी व ती खोलण्यापूर्वी त्याचा डाय‌ग्राम काढून ठेवावा.

7) विजेवर चालणारे उपकरणे चालू स्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू नये.

8) फ्युज तार योग्य आकाराची टाकावी.

9) फाजील आत्मविश्वासाने काम करू नये.

10) मानसिक तणाव असल्यास काम करू नये.

11) बॅटरी चार्जीगच्या खोलीमध्ये जळती ज्योत नेऊ नये.

1.6] ओव्हर हेड लाईन काम करतांना घ्यावयाची काळजी :

1) ओव्हर हेड लाईनवर काम सुरू करण्यापूर्वी त्या लाईनचा मुख्य स्विच बंद करावा व त्या ठिकाणी 'काम चालू आहे'. असा बोर्ड लावावा.

2) सप्लाय चालू असताना काही किरकोळ स्वरूपाचे काम करांवयाचे झाल्यास रबरी हातमोजे घालून काम करावे.

3) लाईन बंद केल्यानंतरही सर्व लाईन कंडक्टर्स हे, एका साखळीने शॉर्ट करावे व त्यापुढे काम करावे.

4) पोलवर काम करतेवेळी नेहमी सेफ्टी बेल्टच्या साह्याने काम करावे.

5) लाईनवर काम करताना टूल्स वरून खाली किंवा खालून वर फेकू नयेत.