1.1 इलेक्ट्रीक शॉक बसण्याचे ठिकाण

इलेक्ट्रीक शॉक बसण्याचे ठिकाण :-
1) एखादी व्यक्ती जमिनीवर उभे राहून शरीराचा एखादा भाग जिवंत लाईनच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीला इलेक्ट्रीक शॉक बसतो.

2) जमिनीपासून इन्सुलेटेड होवून सुध्दा जर विद्युत सप्लाय लाईनच्या वेगवेगळ्या पोलॅरिटीच्या दोन वायर्स किंवा वेगवेगळ्या व्होल्टेजच्या दोन लाईनच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास इलेक्ट्रीक शॉक बसतो.

3) इलेक्ट्रीक मशिनच्या धात्युक्त बॉडीला जोडलेली आर्थिंग योग्य नसेल व अशा बॉडीचा इन्सुलेशन रजिस्टन्स कमजोर असल्यास त्या  बॉडीच्या संपर्कात आल्यास इलेक्ट्रीक शॉक बसतो.

4) विजेच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीस पुरेसे संरक्षण न घेता दुसन्याने त्यास प्रत्यक्ष स्पर्श केल्यास शॉक बसतो.

अशा प्रकारे विजेच्या शॉकमुळे मनुष्य हा तेथील स्थितीनुसार जोराने दूर ढकलला जातो आणि बेशुध्द होतो; किंवा काहीवेळा विजेशी चिकटून मृत्युमुखीही पडू शकतो. म्हणून विजेवर काम करीत असताना तारतंत्री व वीजतंत्री यांनी अत्यंत सावधगीरीने काम केले पाहीजे.