1 सुरक्षितता (Safety)

आपले शरीर विजेचे मंदवाहक आहे. त्यामुळे जमिनीवर प्रत्यक्ष उभे राहून शरीराचा कोणताही भाग विजेच्या जिवंत भागाशी संपर्कात आल्यास, विजेचा शॉक बसतो. अशावेळी विद्युत प्रवाहाच्या मार्ग शरीरामार्फत जमिनीकडे वाहतो व आपले सर्किट पूर्ण करतो. त्यामुळे अचानक मज्जातंतूवर परिणाम होवून भीतीदायक भयानक जाणिव होते. अशा जाणिवेला विजेचा धक्का (इलेक्ट्रीक शॉक्) असे म्हणतात. विजेच्या शॉकची तिव्रता ही, शरीरामधून वाहणाऱ्या प्रवाहाच्या सामर्थ्यावर व प्रवाह वाहण्याच्या वेळेवर अवलंबून असते.

शरीरामधून वाहणारा करंट हा शरीराच्या विद्युत विरोधावर अवलंबून असतो, शरीर आणि जमीन यातील विद्युत विरोध व संपर्कात आलेल्या ठिकाणचा व्होल्टेज यानुसार शरीरातून करंट वाहतो. व्होल्टेज जास्त असेल तर जास्त करंट वाहतो; आणि व्होल्टेज कमी असेल तर करंटही कमी वाहतो. याशिवाय शरीराचा विद्युत विरोध कमी असेल तर जास्त करंट वाहतो, आणि शरीराचा विद्युत विरोध जास्त असेल तर करंट वाहण्याला जास्त विरोध होवून करंट कमी वाहतो. शरीराची कातडी कोरडी असेल तर, त्या शरीराचा विद्युत विरोध हा साधरणपणे 10 ते 600 किलो ओहम असतो. ओल्या कातडीच्या शरीराचा विद्युत विरोध 1000 ओहम (एक किलो ओहम) पर्यंत असतो. ओल्या कातडीच्या शरीराचा संबंध प्रत्यक्ष जमीनीवर उभे राहून विजेच्या संपर्कात आल्यास शरीराचा विद्युत विरोध हा केवळ 100 ओहम असतो. अशा कमी विरोधाच्या शरीराचा संपर्क विजेशी आल्यास ती व्यक्ती मृत्यूमुखीही पडते. साधारणपणे शरीरातून 2 ते 10 मिली अँपीअर (0.002 ते 0.01 अँपीअर) करंट वाहील्यास इलेक्ट्रीक शॉक बसतो. त्या शॉकमुळे शरीरातील स्नायूंचे आकुंचण होते. त्यामुळे हा शॉक एखादेवेळी कमी तिव्रतेचाही असू शकतो किंवा जास्त तिव्रतेचाही असू शकतो. 5 ते 25 मिली अँपीअरचा करंट शरीरातून वाहील्यास बसणारा इलेक्ट्रीक शॉक तिव्र असतो. या शॉकमूळे विजेच्या संपर्कापासून ती अपघाती व्यक्ती दूर न ढकलता विजेशी 1 चिकटूनही राहू शकते. 25 मिली अँपीअर पेक्षा जास्तिचा करंट 2 ते 3 सेकंद शरीरातून वाहील्यास हृदयाचे नैसर्गिक ठोके बंद पडून ती व्यक्ती बेशुध्द पडते किंवा मृत्यूही होते. 50 ते 200 मिली अँपीअर करंट शरीरातून वाहील्यास संपर्कात आलेल्या व्यक्तीचा त्वरीत मृत्यू होतो.

अशा भयानक असणाऱ्या शॉकची तिव्रता करंट वाहण्याच्या वेळेच्या समप्रमाणात असते. म्हणून भयानक वाटणाऱ्या इलेक्ट्रीक शॉकचा उपयोग मानवी जिवनात कांही ठिकाणी उपयोगी सुध्दा असतो. उदा. माफक किंमतीचा करंट क्षणिक पणे शरीरातून पाठवून मनोरूग्णावर उपचारही केला जातो.